Sunday, October 31, 2021

३१ ऑक्टोबर राष्ट्रिय एकता दिवस...

Image Source-Google| Image by-www.news18.com

 

राष्ट्रिय एकता दिवस किंवा राष्ट्रिय एकता दिन २०१४ पासुन दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो. स्वातंत्र्यसैनिक आणि नंतर भारताच्या एकात्मतेत महत्वाची भुमिका बजावणारे राजकारणी सरदार वल्लभभाई पटेल यांची ही १४६वी जयंती.

Image Source-Google| Image by-www.news18.com

 

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते आणि त्यांना "भारताचे लोहपुरुष" म्हणुन ओळखले जाते. स्वातंत्र्यानंतर ५००हुन अधिक संस्थानांना स्वतंत्र  भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी राजी करण्यात त्यांनी मोठी भुमिका बजावली.अनेक अडथळ्यांना न जुमानता त्यांनी सर्व संस्थानांचे नव्याने स्वतंत्र भारतात एकत्रीकरण केले.

२०१४ मध्ये, भारताच्या गृह मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, "राष्ट्रिय एकता दिवस आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षिततेसाठी वास्तविक आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या देशाच्या अंतर्निहीत शक्ती आणि लवचिकतेची पुष्टी करण्याची संधी देईल."

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ "स्टॅच्यु ऑफ युनिटी" चे निर्माण करण्यात आले. या पुतळ्याची उंची १८२ मीटर असुन  हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.

राष्ट्रिय एकता दिन या दिवशी राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयात खालील प्रतिज्ञा वाचुन काढणे आवश्यक आहे.

"मी शपथ घेतो की, मी देशाची एकता, अखंडता आणि  सुरक्षितता जपण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि हा संदेश माझ्या देशबांधवांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुरदृष्टी आणि कृतीमुळे शक्य झालेल्या माझ्या देशाच्या एकीकरणाच्या भावनेन मी हि शपथ घेत आहे. मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी माझे स्वत:चे योगदान देण्याचाही संकल्प करतो."